या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Tuesday, 24 March 2015

.....वादळ मनीचे.....

..........वादळ मनीचे........

सखे, नुसतच तुझं
शून्यात पाहणं...

विचारांच्या कोलाहलात
गोंधळून जाणं...

निर्विकार चेहऱ्यामागचे
दुःख लपविणं...

अखंड बडबड सोडून
फक्त अबोल राहणं...

मनीच्या सर्व भावना
मनातच लपवणं...

ओसांडणाऱ्या आश्नूंना
थोपविण्याचा यत्न करणं...

रुद्ध झालेल्या स्वराला
कोमलतेचा साज देणं...

वर-वर शांत राहत
मनीच्या ज्वालामुखीत जळणं...

जीवनरूपी लढाईत
असं मनाला मारणं...

का गं, दुर्मिळ झालं
तुझं खळखळून हासणं...

                   ------डॉ माधुरी-----

3 comments:

  1. मनाची घुसमट छान मांडलीस....माधुरी !

    ReplyDelete
  2. वेळोवेळी येणारे मनीचे वादळं. ...योग्य शब्दात 👌

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete