..............तू............
मातेच्या गर्भातला श्वास
पित्याचा सार्थ आभिमान तू
बाहेरच्या अजाण जगाला
जाण, नवनवेली तू.....
अनेक दिशा समोर तुझ्या
वाट योग्य आंगिकार तू
अन् पंख प्रगतिचे लावून
. हो, नवचैतन्या तू......
सौंदर्य, बुद्धि अन् धैर्याचे
मूर्तिमंत उदाहरण तू
स्वसंरक्षणासाठी हो सिद्ध
शौर्या अन् सामर्थ्या तू....
ईश्वराची सर्वोत्कृष्ठ निर्मिती
वात्सल्याची साक्षात मूर्ति तू
अन्याया विरूद्ध पूकार लढा
. .......... हो रणरागिनी तू...
... हो रणरागिनी तू......
________ डॉ. माधुरी .
माधुरी स्वागत आहे .
ReplyDeleteअप्रतिम रचना !
छान कविता
ReplyDeleteअतीशय सुंदर!
ReplyDelete