मैत्री
या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !
Wednesday, 11 March 2015
स्मृती
मम नेत्रातले नीर
विखुरले रानभर
स्मृती तुझीच चौफेर
दाटून येतसे
पल्लवीत झाले तरु
उत्साही मनपाखरू
याद तुझीच मोहरू
लागतसे
दारी पावसाचे पाणी
काटा रोमरोमातुनी
रोमांचित आठवणी
तुझीच असे
चांदण्यांचा रे उठाव
अगतिक माझा जीव
तव स्पर्शाचा आठव
मन तरसे
-
संध्या
§
.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment