माझी लेक
तुझ्या येण्याने
आयुष्य फळाला आले
माझ्या जन्माचे
तर सार्थक झाले.
तुझ्या बाल - लिला पाहून
नकळत आम्ही सुखावलो
तुझ्या बरोबर आयुष्य
भरभरून जगू लागलो.
तुझं हासणं - खेेळणं
जणू हर्षाची आठवण
तुझं रागावणं - रुसणं
जणू आनंदाची साठवण.
आई म्हणून येतेस
जेव्हा कुशीत
स्वर्गसूख मिळते
तुझ्या मिठीत
बाबा - बाबा म्हणत
अधिकार गाजवतेस
अन् पटकन त्याच्या
मिठीत सुखावतेस.
यश, सुख समृद्धि आनंद
सारे काही मिळावे तुला
तू सर्वांच्या शिखरि असताना
पाहत रहावे, आभा फक्त तूला
- तुझी आई
४/३/१५
या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !
Wednesday, 25 March 2015
....माझी लेक...
Subscribe to:
Post Comments (Atom)
नमस्कार! मराठी ब्लॉग जगत्वर ब्लॉग जोडण्यासाठी आपली नोंद मिळालेली आहे. मात्र नियमानुसार आपण मराठी ब्लॉग जगत्चे चिन्ह ह्या ब्लॉगवर जोडलेले नसल्याने अद्याप आपला ब्लॉग जोडला गेलेला नाही. सदर माहिती मराठी ब्लॉग जगत्वर लाल रंगाच्या ठळक अक्षरांमध्ये सर्वांना दिसेल अशी लिहिलेली आहे.
ReplyDelete